Join us
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढणार, जोगेंद्र कवाडे यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:42 IST

संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढण्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली.

मुंबई -  केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री आणि नेते संविधान हटवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळेच संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी भीमा कोरेगाव-भीमा ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढण्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी आज केली. या लाँग मार्चला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, तर ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर हा मोर्चा धडक देईल. पीपल्स रिपल्बिकन पार्टीने मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जोगेंद्र कवाडे यांनी या संविधान सन्मान लाँग मार्चमध्ये हजारो भीमसैनिक सामील होतील,असा दावा केला. ''भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर, रिपाइं (ए) चे अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना संविधानाचा आदर असेल, तर त्यांनी या मार्चमध्ये सामील व्हावे, ''असे आवाहन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. 

टॅग्स :जोगेंद्र कवाडेराजकारणभाजपामहाराष्ट्र