संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांच्या अटकेसाठी दादरमध्ये काँग्रेसची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 12:39 IST2018-08-13T12:36:21+5:302018-08-13T12:39:56+5:30

मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दादर रेल्वे स्थानक येथील स्वामी नारायण मंदिरासमोर निदर्शने सुरू आहेत.

Constitution burning: protest in dadar demanding arrest of accused | संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांच्या अटकेसाठी दादरमध्ये काँग्रेसची निदर्शने

संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांच्या अटकेसाठी दादरमध्ये काँग्रेसची निदर्शने

मुंबई - 9 ऑगस्ट 2018 रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे एस सी, एस टी चा विरोध करीत काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा व अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुंबईकाँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दादर रेल्वे स्थानक येथील स्वामी नारायण मंदिरासमोर निदर्शने सुरू आहेत.

मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव यांनी सांगितले की, आरोपींना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून अशा समाजकंटकांना धडा शिकवेल. दरम्यान या निदर्शनांना काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दांडी मारल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 

Web Title: Constitution burning: protest in dadar demanding arrest of accused