उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध; रेल्वे प्रवासी भवन, गोठ्यांना परवानगी देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:38 IST2025-12-22T10:37:36+5:302025-12-22T10:38:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला असून रविवारी या ...

उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध; रेल्वे प्रवासी भवन, गोठ्यांना परवानगी देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला असून रविवारी या जाहीरनाम्याचे प्रकाशन मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘संवाद उत्तर भारतीयों से, चर्चा मुद्दों पर’ या मालाड येथे आयोजित कार्यक्रमात एकूण सात मुद्द्यांचा समावेश करण्यात आला.
उत्तर भारतीय सेलच्या वतीने वर्षा गायकवाड यांच्या सूचनेनुसार ‘संवाद उत्तर भारतीयों से, चर्चा मुद्दों पर’ ही मोहीम शहराच्या विविध भागांत राबवण्यात आली. या कालावधीत सेलच्या पथकांनी गायी-म्हशींचे गोठे, धोबी घाट, ऑटो–रिक्षा व टॅक्सी चालक, फेरीवाले तसेच कामगार वस्तीच्या परिसरात जाऊन उत्तर भारतीय समाजाच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची थेट नोंद घेतली. यावरून एक जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, सामाजिक-राजकीय संरक्षण, रिक्षा-टॅक्सी विश्राम केंद्र आणि सीएनजी स्टेशनच्या संख्येत वाढ करणे, रेल्वे स्टेशनवर ट्रान्झिट कॅम्प सुरू करणे, छठपूजेसाठी सगळ्या संस्थांना परवानगी देणे, उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांसाठी भव्य प्रवासी भवन आणि गोठ्यांना परवाने द्यावे, अशा उत्तर भारतीय समाजाच्या मागण्या आहेत.