काँग्रेस पक्ष युतीचा निर्णय दबावात घेणार नाही: सचिन सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:28 IST2025-10-25T10:28:25+5:302025-10-25T10:28:25+5:30
सावंत यांनी पलिका निवडणुकीतील संभाव्य युतीबाबत भाष्य करताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेस पक्ष युतीचा निर्णय दबावात घेणार नाही: सचिन सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली असतानाच काॅंग्रेस पक्ष युतीबाबतचा निर्णय कोणाच्याही दबावाखाली घेणार नाही, असे मुंबई काॅंग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी जाहीर केले.
सावंत यांनी पलिका निवडणुकीतील संभाव्य युतीबाबत भाष्य करताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या निवडणुका प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या असतात. यानिमित्ताने पक्षाचे चिन्ह, झेंडा प्रत्येक बूथवर पोहोचावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते, असे सांगितले.
चर्चा करण्याची मुभा
दोन दिवसांपूर्वी उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, ते युतीबाबत काॅंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील. यावर सावंत यांनी कुणाचेही नाव न घेता भाष्य केले. अन्य कोणत्याही पक्षाला काॅंग्रेसच्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करायची असेल, तर त्यांना ती मुभा आहे. त्यांचेही ऐकले जाईल. काॅंग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. मात्र, काॅंग्रेस पक्षाचा निर्णय काॅंग्रेस पक्षच घेईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.