फिक्सर अधिकारी व संबंधित मंत्र्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत; कुणी केली मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:40 IST2025-02-26T17:40:24+5:302025-02-26T17:40:44+5:30
Congress News: १६ अधिकारी कोण आहेत व ते कोणत्या मंत्र्यांकडे काम करत होते, असा सवाल करण्यात आला आहे.

फिक्सर अधिकारी व संबंधित मंत्र्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत; कुणी केली मागणी?
Congress News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर आपणच राज्याचे प्रमुख आहोत, हे सिद्ध करण्याची एकही संधी देवेंद्र फडणवीस सोडत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी १२५ पैकी १०९ जणांच्या नावांना मंजुरी दिली, तर १६ जणांच्या नावावर फुली मारली. स्वीय सहायक कोण हवेत, विशेष कार्य अधिकारी कोणाला नेमावे, ही निवड मंत्री करू शकतातच. मात्र, अंतिम मंजुरी मुख्यमंत्र्यांची असेल हे फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यासंदर्भात दावे केले जात आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितले आहे की, ओएसडी आणि पीए नियुक्तीसंदर्भात. जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातील १६ जण दलाल आणि फिक्सर होते. माझे मुख्यंमत्र्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आवाहन आहे की, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावे पाठवली होती, ती तुम्ही जाहीर करा, अशी मागणी संजय राऊतांनी केली होती. यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर भाष्य केले आहे.
फिक्सर अधिकारी व संबंधित मंत्र्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांकडे पीए, ओएसडी आणि पीएस म्हणून काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना फिक्सर म्हटल्याने सर्वच अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे, त्यामुळे हे १६ अधिकारी कोण आहेत व ते कोणत्या मंत्र्यांकडे काम करत होते हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
दरम्यान, मुंबईतील पेटंटचे कार्यालय केंद्रातील सरकारने दिल्लीला हलवले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यापासून मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील अनेक महत्वाची कार्यालयाचे राज्याबाहेर हलवली आहेत. यातील बहुतांश कार्यालये गुजरातला हलवली आहेत. पालघर येथे होणा-या सागरी पोलीस मुख्यालय, मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र यासारखी अठरा हून अधिक कार्यालये हलवली आहेत आणि आता पेटंट कार्यालय हलवले जात आहे. मोदींच्या सरकारने महाराष्ट्राची लूट चालवली आहे. राज्याच्या सत्तेत बसलेले मोदी शांह यांचे एजंट या कामी त्यांना मदत करत आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.