बाबूराव कुलकर्णी यांना काँग्रेसकडून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:22 IST2019-07-31T06:21:44+5:302019-07-31T06:22:01+5:30
विधान परिषद निवडणूक

बाबूराव कुलकर्णी यांना काँग्रेसकडून उमेदवारी
मुंबई : विधान रिषदेच्या औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने बाबूराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे.
बाबूराव कुलकर्णी यांच्या उमेदवारीची घोषणा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, कुलकर्णी हे ज्येष्ठ नेते असून औरंगाबाद, जालना या दोन्ही जिल्ह्यांत त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने ते निश्चित विजयी होतील. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उपस्थित होते. औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान व २२ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे.