टिपू सुलतानप्रकरणी भाजपचा दुटप्पीपणा, कॉँग्रेसचा आरोप; भाजपनेच मांडले याआधी टिपूंच्या नावाचे ठराव : सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 06:04 IST2026-02-16T06:03:08+5:302026-02-16T06:04:56+5:30
टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करणाऱ्या भाजपनेच पूर्वी विविध ठिकाणी त्यांच्या नावाचे ठराव मांडल्याचा पुरावा देत असल्याचा दावा त्यांनी केला.

टिपू सुलतानप्रकरणी भाजपचा दुटप्पीपणा, कॉँग्रेसचा आरोप; भाजपनेच मांडले याआधी टिपूंच्या नावाचे ठराव : सावंत
मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी टिपू सुलतान प्रकरणावरून भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव येथे टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करणाऱ्या भाजपनेच पूर्वी विविध ठिकाणी त्यांच्या नावाचे ठराव मांडल्याचा पुरावा देत असल्याचा दावा त्यांनी केला.
...अखेर, बांगलादेशी जनतेनेच लोकशाही वाचवली!
२०१२ मध्ये अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला ‘शहिदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान’ नाव देण्याचा ठराव भाजपनेच मांडला होता. २०१३ मध्ये मुंबईतील एम/पूर्व वॉर्डात ‘शहीद टिपू सुलतान मार्ग’ नामकरण प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक उपस्थित होते, तसेच २००१ मध्ये अंधेरी (प) येथे ‘शेरे म्हैसूर टिपू सुलतान’ मार्ग नामकरणाला भाजपच्या नेत्यांची उपस्थिती होती.
याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन गौरवोद्गार नोंदवले होते, तर २०१७ मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही कर्नाटक विधानसभेत त्यांचा उल्लेख केला होता.
भाजपला पूर्वी टिपू सुलतानांविषयी आदर होता. मात्र, ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी आज त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सावंत यांनी यावेळी केला.
दरम्यान, भाजपच्या आरोपांना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते पुढे आले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.