नवी मुंबई विमानतळाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:44 AM2020-11-06T02:44:03+5:302020-11-06T07:06:17+5:30

Navi Mumbai Airport : आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने या विमानतळाचे टेकऑफ डिसेंबर २०१९ मध्ये होईल असा दावा केला होता. मात्र, नंतर मे २०२० ची तर नंतर डिसेंबर २०२० ची डेडलाईन ठरविण्यात आली होती.

Complete the work of Navi Mumbai Airport by 2021, instructions given by the Chief Minister in the meeting | नवी मुंबई विमानतळाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश 

नवी मुंबई विमानतळाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश 

Next

मुंबई : महत्त्वाकांक्षी नवी मुंबईविमानतळाचे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण करा अशी डेडलाईन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची ठाकरे यांनी बैठक घेतली व त्यात हे निर्देश दिले.
आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने या विमानतळाचे टेकऑफ डिसेंबर २०१९ मध्ये होईल असा दावा केला होता. मात्र, नंतर मे २०२० ची तर नंतर डिसेंबर २०२० ची डेडलाईन ठरविण्यात आली होती. अद्यापही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.  त्यामुळे येत्या डिसेंबरपासून हे विमानतळ सुरू होऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही परिस्थितीत मे २०२१ पर्यंत विमानतळ सुरू व्हायला हवे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मे २०२१ पर्यंत काम पूर्ण व्हायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

अदानी समूहांकडे हस्तांतरीत होणार विमानतळाचे काम 
 मे २०२० ची तर नंतर डिसेंबर २०२० ची डेडलाईन ठरविण्यात आली होती. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मे २०२१ पर्यंत काम पूर्ण व्हायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.हे विमानतळ जीव्हीके ग्रुपकडून अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

Web Title: Complete the work of Navi Mumbai Airport by 2021, instructions given by the Chief Minister in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.