Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडियन वीर दासच्या वक्तव्याविरोधात पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 07:57 IST

वीर दासने जॉन एफ. केनेडी सेंटरच्या झालेल्या शोच्या शेवटी, ‘टू  इंडिया’ या शीर्षकाखाली एकपात्री प्रयोग सादर केला होता.

ठळक मुद्देआशुतोष दुबे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास याने अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात भारतीयांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात त्याच्यावर टीका होत आहे. एका वकिलाने मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

वीर दासने जॉन एफ. केनेडी सेंटरच्या झालेल्या शोच्या शेवटी, ‘टू  इंडिया’ या शीर्षकाखाली एकपात्री प्रयोग सादर केला होता. त्यात त्याने म्हटले, मी अशा भारतातून येतो जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो, त्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर टीका होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. सोबतच भारताविरुद्ध अपशब्द वापरल्याप्रकरणी वीर दासविरोधात ॲड. आशुतोष दुबे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस