ट्विटरवरून केली छेडछाडीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 05:05 IST2017-11-30T05:05:14+5:302017-11-30T05:05:31+5:30

अंधेरीमध्ये एका १७ वर्षीय मुलीची छेड काढण्यात आली. हा प्रकार दोन आठवड्यांपूर्वी अंधेरी परिसरात घडला. पीडित तरुणीने या प्रकरणी मुंबई पोलिसांना टिष्ट्वट केले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले.

 Complaint about Twitter made by Twitter | ट्विटरवरून केली छेडछाडीची तक्रार

ट्विटरवरून केली छेडछाडीची तक्रार

मुंबई : अंधेरीमध्ये एका १७ वर्षीय मुलीची छेड काढण्यात आली. हा प्रकार दोन आठवड्यांपूर्वी अंधेरी परिसरात घडला. पीडित तरुणीने या प्रकरणी मुंबई पोलिसांना टिष्ट्वट केले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले.
विनया (नावात बदल) या मुलीने ९ नोव्हेंबरला मुंबई पोलिसांना एक टिष्ट्वट केले होते. ही मुलगी घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने मागून येऊन तिची छेड काढली. हा प्रकार जे. बी. नगर परिसरात घडला. ही तक्रार तिने अंधेरी पोलिसांकडे टिष्ट्वटरवरून केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. ‘आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पहिले. मात्र त्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही’ असे अंधेरी पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र लवकरच त्याला गजाआड करू, असे तपास अधिकाºयांनी सांगितले.

Web Title:  Complaint about Twitter made by Twitter