शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:34 AM2022-05-23T05:34:26+5:302022-05-23T05:34:57+5:30

आधी शिवबंधन आणि मगच उमेदवारी ही शिवसेनेची ऑफर संभाजीराजे यांनी अजून स्वीकारलेली नाही. 

come to matoshri for Shivbandhan cm uddhav thackeray message shiv sena sambhaji raje talks draw | शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित

शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील रविवारच्या वाटाघाटी अनिर्णित राहिल्या. आधी शिवबंधन आणि मगच उमेदवारी ही शिवसेनेची ऑफर संभाजीराजे यांनी अजून स्वीकारलेली नाही. 

महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा नवा पर्याय समोर आला असला तरी त्यावरही एकमत झालेले नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते खा. अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेल ट्रायडन्ट येथे संभाजीराजे यांची भेट घेत उमेदवारीबाबत चर्चा केली. खा. संजय राऊत यांनीही संभाजीराजे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. राजे, उद्या शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप राऊत यांच्याकरवी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना दिला आहे.

Web Title: come to matoshri for Shivbandhan cm uddhav thackeray message shiv sena sambhaji raje talks draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.