मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले बंधू आणि उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून घरच्या गणपतीच्या दर्शनाचे आमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला असून ते गणेश दर्शनासाठी पहिल्याच दिवशी सहकुटुंब 'शिवतीर्था'वर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित गणेश दर्शनाचा योग साधला जाणार असल्याची चर्चा आहे.
बंधूंमध्ये जवळीक वाढलीदोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी वाढल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ५ जुलै २०२५ रोजी एकाच मंचावर दिसले होते. यानंतर २७ जुलै २०२५ रोजी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या.