Join us  

'अशा काळात महाविद्यालयांनी डेव्हलपमेंट शुल्क घेऊ नये, लवकरच निर्णय होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 2:43 PM

कोरोना महामारीमुळे सध्या देशात लॉकडाऊननंतर अनलॉक प्रकिया सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली नाहीत.

ठळक मुद्देएका ट्विटर युजर्संने पुण्यातील एमआयटी कॉलेजमधील विद्यार्थ्याने डेव्हलपमेंट फीला आक्षेप घेतला आहे. आम्ही कॉलेजला जात नाहीत, कुठलिही फॅसिलीटी घेत नाहीत. तरीही, कॉलेजकडून डेव्हलपमेंट फी घेण्यात येत आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय बनला आहे. त्यात, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे तर ट्विटरवरुनच नागरिकांच्या समस्या समजून घेत, त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. रोहित पवार यांना एका युजर्सने आपली व्यथा ट्विटरच्या माध्यमातून सांगितली. यावर, तत्काळ दखल आमदार पवार यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिलंय. तसेच, महाविद्यालयांनी अशा काळात डेव्हलपमेंट चार्ज घेणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. 

कोरोना महामारीमुळे सध्या देशात लॉकडाऊननंतर अनलॉक प्रकिया सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली नाहीत. मात्र, शाळां, कॉलेजेस आपल्या विद्यार्थ्यांकडून फी भरुन घेत आहेत. विशेष म्हणजे या फीमध्ये महाविद्यालयाकडून डेव्हलपमेंट चार्जही घेण्यात येत आहे. एककडे कोरोनामुळे लोकांचे रोजगार बुडाले असून कामधंदा नाही, अनेकांना जगणं मुश्कील झालं असतानाही महाविद्यालयाची ही भूमिका योग्य नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. 

एका ट्विटर युजर्संने पुण्यातील एमआयटी कॉलेजमधील विद्यार्थ्याने डेव्हलपमेंट फीला आक्षेप घेतला आहे. आम्ही कॉलेजला जात नाहीत, कुठलिही फॅसिलीटी घेत नाहीत. तरीही, कॉलेजकडून डेव्हलपमेंट फी घेण्यात येत आहे. आधीच शेतकरी अन् सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे कृपया आपण लक्ष घालावे, अशी विनंती रोहित पवार यांच्याकडे केली होती. रोहित यांनी तत्काळ दखल घेत, मी यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्याचं म्हटलंय. तसेच, लवकरच याबाबत निर्णय होईल, असेही सांगितले. रोहित पवार तरुणांच्या प्रश्नावर नेहमीच जागरुक असतात, यापूर्वीही त्यांनी नव्याने तलाठी भरती झालेल्या तरुणांच्या समस्येचा प्रश्न उचलून धरला होता. 

टॅग्स :रोहित पवारशिक्षणमहाविद्यालयपुणे