Join us

महाविद्यालय जवळचे की पसंतीचे?; अकरावीसाठी पहिल्या फेरीची मुदत संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 06:22 IST

बहुतांश विद्यार्थ्यांनी दुसऱ्या यादीतील महाविद्यालय निवडीला प्राधान्य दिले आहे.

मुंबई : राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली फेरी झाली आहे. पहिल्या फेरीत राज्यात सुमारे २,१८,३४२ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, पहिल्या फेरीत अनेक विद्यार्थ्यांनी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड होऊनही नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा की जवळच्या महाविद्यालयाला प्राधान्य द्यायचे, यावरून प्रवेश निश्चित केलेले नाहीत. बहुतांश विद्यार्थ्यांनी दुसऱ्या यादीतील महाविद्यालय निवडीला प्राधान्य दिले आहे.

अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागातून एकूण ५,८०,६९५ जागा आहेत. त्यापैकी तीन ऑगस्टला जाहीर केलेल्या पहिल्या यादीत २,१८,३४२ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट केले आहेत. मात्र, शनिवारी सायंकाळी पाचपर्यंत केवळ १,०१,४७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. यंदा नामांकित महाविद्यालयासह कट ऑफ घसरला असला तरी कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत पाचव्या ते सहाव्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. 

तज्ज्ञ काय सांगतात?

पसंतीच्या महाविद्यालयापेक्षाही प्रवासाचा वेळ, क्लास, इतर ॲक्टिव्हिटीज आणि घरापर्यंतचे अंतर या सर्वाचा विचार करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची निवड करावी, विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे? विद्यार्थ्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या काय झेपणार आहे या सगळ्यांचा विचार करीत प्रवेश निवडीसाठी पालकांनी योग्य मार्गदर्शन करावे, असे समुपदेशक सांगतात. 

पहिल्या फेरीतील अलॉटमेंट  विभाग    कनिष्ठ महाविद्यालये    प्रवेश क्षमता    अलॉटमेंट अमरावती    १०१५    १६१९०    ५९२१मुंबई    १०१५    ३७१२७५    १, ३९, ६५१नागपूर    २०२    ५५,३२०    १७४७५ नाशिक    ६३    २६४८०    १२६२३पुणे    ३१७    १,११,४३०    ४२६९०एकूण    १६६२    ५८०६९५    २,१८, ३४२

टॅग्स :विद्यार्थीमहाराष्ट्रमुंबई