‘लोकमत लंडन इकॉनॉमिक कन्व्हेंशन’च्या ‘कॉफी टेबल बुक’चे मुंबईत प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:51 IST2026-04-10T12:50:35+5:302026-04-10T12:51:01+5:30

लंडन येथे पार पडलेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेंशन’ कार्यक्रमाच्या ‘कॉफी टेबल बुक’चे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत विमोचन झाले. यावेळी (डावीकडून) लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, मंत्री शेलार, लोकमत मीडियाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी.

‘Coffee Table Book’ of ‘Lokmat London Economic Convention’ released in Mumbai | ‘लोकमत लंडन इकॉनॉमिक कन्व्हेंशन’च्या ‘कॉफी टेबल बुक’चे मुंबईत प्रकाशन

‘लोकमत लंडन इकॉनॉमिक कन्व्हेंशन’च्या ‘कॉफी टेबल बुक’चे मुंबईत प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेंशन लंडन येथे पार पडले होते. त्याच्या कॉफी टेबल बुकचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि लोकमत मीडियाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. लंडन येथे पार पडलेल्या या कन्व्हेंशनमध्ये सहभागी झालेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे संदेश, माहिती, फोटो या कॉपीटेबल बुकमध्ये आहे.

महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांना परदेशात नेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाला नवे पंख देणे यासाठी अशा उपक्रमांची गरज असते. ही गरज ओळखून ‘लोकमत’ने लंडनच्या आधी दुबई, सिंगापूर, बाकू, हाँगकाँग अशा विविध ठिकाणी असे कार्यक्रम केल्याचा आवर्जून उल्लेख मंत्री शेलार यांनी केला.

न्यायालयीन निकालावर समाधान व्यक्त करत मंत्री शेलार यांनी डॉ. विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांचे अभिनंदनही केले. राज्य सरकारने १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत आणले. त्यावर तयार केलेले विशेष कॉफी टेबल बुक शेलार यांनी डॉ. विजय दर्डा यांना भेट दिले. यावेळी मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.

Web Title : लोकमत लंदन इकोनॉमिक कन्वेंशन की कॉफी टेबल बुक मुंबई में लॉन्च

Web Summary : लोकमत ग्लोबल इकोनॉमिक कन्वेंशन की कॉफी टेबल बुक, जो लंदन में आयोजित हुई थी, का अनावरण मुंबई में मंत्री आशीष शेलार और लोकमत मीडिया के डॉ. विजय दर्डा और देवेंद्र दर्डा ने किया। शेलार ने दुबई, सिंगापुर और हांगकांग में आयोजित पिछले कार्यक्रमों का हवाला देते हुए विदेश में उपलब्धियों का सम्मान करने के लिए लोकमत के प्रयासों पर प्रकाश डाला।

Web Title : Lokmat London Economic Convention's Coffee Table Book Launched in Mumbai

Web Summary : The Lokmat Global Economic Convention's coffee table book, from the London event, was unveiled in Mumbai by Minister Ashish Shelar, along with Lokmat Media's Dr. Vijay Darda and Devendra Darda. Shelar highlighted Lokmat's efforts in honoring achievers abroad, citing past events in Dubai, Singapore, and Hong Kong.