ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:25 IST2025-07-15T16:25:19+5:302025-07-15T16:25:45+5:30

मुंबई विमानतळावर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत ६२ कोटी रुपयांच्या कोकेनसह महिला प्रवाशाला अटक करण्यात आली.

Cocaine worth Rs 62 crores hidden in Oreo and chocolate boxes action taken at Mumbai airport | ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

Mumbai Airport: महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईविमानतळावर एका भारतीय महिलेला ६२.६ कोटी रुपयांच्या कोकेनसह अटक केली. दोहाहून मुंबईत आलेल्या महिलेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकेन सापडल्याने खळबळ उडाली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तस्करी करणाऱ्या महिलेला विमानतळावर पकडले. १४ जुलै रोजी  माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.  गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटलं जात आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाला ३०० कॅप्सूलमध्ये ६ किलोपेक्षा जास्त कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली. जप्त केलेल्या कॅप्सूलची अंदाजे किंमत ६२.६ कोटी रुपये आहे. महिलेच्या सामानाची झडती घेतली तेव्हा डीआरआय अधिकाऱ्यांना ओरिओ बिस्किटांचे ६ मोठे बॉक्स आणि चॉकलेटचे तीन बॉक्स सापडले. हे ९ बॉक्स उघडल्यावर, पावडर असलेल्या ३०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.

या कारवाईत एकूण ६.२६१ किलो कोकेन जप्त करण्यात आले, ज्याची बेकायदेशीर बाजारात अंदाजे किंमत ६२.६ कोटी रुपये आहे. सर्व ड्रग्ज नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आले. प्रत्येक कॅप्सूलची फील्ड टेस्ट किट वापरून चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये ते कोकेन असल्याचे समोर आले.

दरम्यान, यापूर्वी २२ जून रोजी डीआरआयने सिएरा लिओन येथून आलेल्या एका पुरुष प्रवाशाला अटक केली होती. त्याच्याकडून ११.३९ कोटी रुपयांचे ११३९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तर २० जून रोजी दिल्ली ते मुंबई बसमधून ड्रग्ज तस्करीच्या संशयावरून एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली होती. ५० किमी पाठलाग केल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली.
 

Web Title: Cocaine worth Rs 62 crores hidden in Oreo and chocolate boxes action taken at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.