कोकेन लपवले पोटात, ‘एक्स-रे’ने केले भंडाफोड; विमानतळावर दोन विदेशींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 14:18 IST2023-10-12T14:18:05+5:302023-10-12T14:18:43+5:30
अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा लावला. महिला विमानतळावर उतरताच तिच्या सामानाची झडती घेण्यात आली. मात्र, त्यात काहीच आढळले नाही.

कोकेन लपवले पोटात, ‘एक्स-रे’ने केले भंडाफोड; विमानतळावर दोन विदेशींना अटक
मुंबई : परदेशातून आलेल्या दोन प्रवाशांनी कोकेनची तस्करी केल्याप्रकरणी त्यांना मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना असून यातील परदेशी महिलेने चक्क पोटात कोकेन लपवून आणले. मात्र, ‘एक्स-रे’मुळे या तस्करीचा पर्दाफाश झाला.
इथिओपिया येथून मुंबईत येणारी महिला अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा लावला. महिला विमानतळावर उतरताच तिच्या सामानाची झडती घेण्यात आली. मात्र, त्यात काहीच आढळले नाही.
एक्स-रेद्वारे तपासणी
- तस्करीची माहिती १०० टक्के खरी असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अनुमतीने एक्स-रेद्वारे तपासणी केली.
- यावेळी महिलेच्या पोटामध्ये कोकेन आढळले. तिला मुंबईतील जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, तिच्या पोटातून कोकेन काढण्याची प्रक्रिया डॉक्टरांनी सुरू केली आहे.
- दुसऱ्या घटनेमध्ये सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी टांझानियातून मुंबईत आलेल्या ४२ वर्षीय नागरिकाकडून २१० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.