Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:39 IST2025-06-14T16:36:23+5:302025-06-14T16:39:41+5:30
Coastal Road Tunnel Video: पावसामुळे कोस्टल रोड बोगद्यातील रस्ता निसरडा झाला असून, एक कार नियंत्रित होऊन कठड्याला धडकली आणि उलटली.

Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
Coastal road tunnel accident News: मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात एका कारचा अपघात झाला. शुक्रवारी (१३ जून) झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला आहे. भरधाव कार निसरड्या रस्त्यामुळे अनियंत्रित होऊन कठड्यावर जाऊन आदळते आणि त्यानंतर उलटते. बोगद्याच्या मध्यभागी हा अपघात झाला. त्यामुळे वाहतूक कोडींची झाली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाऊस झाल्यामुळे कोस्टल रोडवरील बोगद्यातील रस्ता निसरडा झाला. त्यामुळे शुक्रवारी एका कारचा भीषण अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कसा झाला अपघात, बघा व्हिडीओ
शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता एक भरधाव कार रस्त्यावरून घसरली आणि अनियंत्रित होऊन बोगद्याच्या कठड्याला जाऊ धडकली. कार वेगात असल्यानंतर कठड्यावर आदळल्यानंतर पलटी होऊन रस्त्याच्या मध्ये पडली.
वाचा >>'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
Mumbai’s Coastal Road Tunnel
— Zoru Bhathena (@zoru75) June 14, 2025
Slippery when wet pic.twitter.com/fzHrz081wT
एअर बॅगमुळे जीवितहानी झाली नाही. पण, या अपघातात दोघे जखमी झाले. सुदैवाने हा अपघात घडला, त्यावेळी आरटीओचे पथक जात होते. त्यांनी तातडीने आपात्कालीन कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातग्रस्त कार टोईंग करून नेण्यात आली. या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचे नाव विकास सोनवणे असून, ते फूड इन्स्पेक्टर आहेत.