CNG Crisis: ‘सीएनजी’ची बोंब, हजारो वाहने रस्त्यावरून गायब, प्रवाशांचे प्रचंड हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:38 IST2025-11-18T12:36:34+5:302025-11-18T12:38:38+5:30
मुंबई: सीएनजीअभावी अनेक रिक्षा, टॅक्सीचालकांनी लांबचे भाडे घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

CNG Crisis: ‘सीएनजी’ची बोंब, हजारो वाहने रस्त्यावरून गायब, प्रवाशांचे प्रचंड हाल!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: सीएनजीअभावी अनेक रिक्षा, टॅक्सीचालकांनी लांबचे भाडे घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सोमवारी सीएनजीअभावी रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस, बेस्टच्या बस, खासगी गाड्या रस्त्यांवर नसल्याने वाहतूककोंडी काहीशी कमी झाली होती.
घरगुती पीएनजी ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्राधान्याने पुरवठा करत आहे. सीजीएस वडाळा आणि त्यामुळे एमजीएल पाइपलाइन नेटवर्कमधील गॅस पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही सीएनजी स्टेशन कार्यरत नाहीत. सध्या, ‘एमजीएल’च्या एकूण ३८९ सीएनजी स्टेशनपैकी २२५ सीएनजी स्टेशन कार्यरत आहेत, असा दावा महानगर गॅस लिमिटेडने केला आहे. सीएनजीच्या तुलनेत पेट्रोल २५ रुपये महाग आहे. सीएनजीऐवजी पेट्रोलवर गाडी चालविल्यास ॲव्हरेज देखील कमी मिळत असल्याने प्रवासी वाहनमालकांचे साधारण ३३ टक्के नुकसान झाले.
सीएनजी पुरवठा बंद झाल्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालक- मालकांचे जवळपास २ दिवसांचे उत्पन्न बुडणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी महानगर गॅस लिमिटेडची असून त्यांनी रिक्षा-टॅक्सीचालक- मालकांना त्यांच्या २ दिवसांच्या नुकसानीची भरपाई द्यावी.- शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटो रिक्षा- टॅक्सी मेन्स यूनियन
गॅसची राज्यभर एकाधिकारशाही आहे. त्यामुळे त्यांच्या यंत्रणेत बिघाड झाल्यावर आम्हाला त्रास होतो. हे कुठे तरी थांबले पाहिजे. सोमवारी अतिरिक्त पैसे देऊन आम्हाला स्कूल बस चालवाव्या लागल्या. - अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन