CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: 'हा देश तुमची खासगी मालमत्ता नाही अन् महाराष्ट्र तर नक्कीच नाही'

By महेश गलांडे | Published: March 3, 2021 04:47 PM2021-03-03T16:47:01+5:302021-03-03T16:49:27+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संत नामदेवांचा उल्लेख करताना, संत नामदेव हे आपले आदर्श आहेतच. संतांची आपल्याला मोठी शिकवण, ते आहेत म्हणूनच आपण आहोत.

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: 'Country is not your private property and Maharashtra is definitely not', uddhav thackeray on modi government | CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: 'हा देश तुमची खासगी मालमत्ता नाही अन् महाराष्ट्र तर नक्कीच नाही'

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: 'हा देश तुमची खासगी मालमत्ता नाही अन् महाराष्ट्र तर नक्कीच नाही'

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आमच्याकडे विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे आहेत, पण हे ऐकायला ज्यांनी प्रश्न विचारले ते हवे होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील भाषणाला सुरुवात केली. त्याचवेळी, सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले अन् व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. विधानसभेतील उत्तरावेळी आपल्या फेसबुक लाईव्हवरुन फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. तसेच, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन हा देश तुमची खासगी मालमत्ता नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संत नामदेवांचा उल्लेख करताना, संत नामदेव हे आपले आदर्श आहेतच. संतांची आपल्याला मोठी शिकवण, ते आहेत म्हणूनच आपण आहोत. त्यांचा सन्मान करायलाचा पाहिजे. चंद्रकांत दादा, संत नामदेव हे आपल्या महाराष्ट्राचे पुत्र होते. पण, त्यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं. मग, पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर बसलाय, याकडे लक्ष द्या. नामदेव महाराजांची आठवण येऊ द्या, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला. 

दिल्तील शेतकऱ्याच्या मार्गात खिळे अन् चीन दिसले की पळे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देश ही तुमची खासगी मालमत्ता नाही, महाराष्ट्र तर नाहीच... देश ही शेतकऱ्यांची मालमत्ता आहे. स्वातंत्र्य लढ्यात आम्ही तर नव्हतोच, पण तुमची मातृसत्ताही स्वातंत्र्यलढ्यात नव्हती. त्यामुळे, भारत माता की जय बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. केवळ भारत माता की जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नसतं. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे, पण आंदोनलासाठी बसलेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही कधी सोडवणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विरोधकांना विचारला.  

फेसबुक लाईव्हवरील टीकेला उत्तर

मी कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करतो होतो. या फेसबुक लाईव्हरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळे महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली, हीच माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. फेसबुक लाईव्हमधून मी महाराष्ट्राच्या जनतेच्या घरात पोहोचलो, नागरिकांना धीर मिळाला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच कोरोना काळातील घोटाळा आणि आरोपांवरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. हा व्हायरस आहे, तो व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सभागृहातच टोला लगावला. 

बंद दाराआडही खोट बोलत नाही

देशातील सर्वात मोठं जम्बो हॉस्पीटल आपण केलंय. कोरोनावर महाराष्ट्र सरकारने मोठं काम केलंय. केंद्रीय आर्थिक अहवाला तपासणी केली. ज्यांनी नोटबंदीवेळी ते अध्यक्ष आहेत. ते अर्थशास्त्राचे डॉक्टर आहेत. आपत्तीकाळात वैद्यकीय शास्त्राचा कंपाऊंडर बरा की, अर्थशास्त्राचा डॉक्टर?. या समितीने कशावरुन निष्कर्ष काढले, बिहारला समोर धरुन हे निष्कर्ष काढले आहेत, पण बिहारमधील कोविड परिस्थितीची आकडेवारी कशीय हे आम्हाला माहितीय, कशी आकडेवारी आली, कसे फोन कॉल्स यायचे, असे हे निष्कर्ष. आम्ही खोटेपणा कधीच केला नाही, खोटेपणा आमच्या रक्तात नाही. आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, बंद दाराआडही नाही, यापुढेही बोलणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
 

Web Title: CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: 'Country is not your private property and Maharashtra is definitely not', uddhav thackeray on modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.