Join us  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 1:56 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद या सभागृहाचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक होते.

मुंबई - विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद या सभागृहाचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक होते.

दरम्यान, राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विधान परिषदेची निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केल्याने उद्धव ठाकरे यांच्या पदावर संकट निर्माण झाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने दिला होता. मात्र त्यावरून मोठा पेच निर्माण झाल्यानंतर राज्यपालांनी राज्यात विधान परिषदेची निवडणूक घेण्याची शिफारस केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पाच आणि भाजपाचे चार सदस्य नियुक्त झाले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

इस्राइलमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदी, मोदींनी दिल्या शुभेच्छा 

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक, गुन्हा दाखल 

निर्मला सीतारामन यांचा व्यापारी, उद्योजकांना दिलासा

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र सरकारविधान परिषद