Join us

मुंबईकर उभारणार मेट्रोची गुढी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखवणार हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 07:09 IST

आठ वर्षांनी आणखी दोन नवीन मेट्रो मार्ग

मुंबई : कोरोनाचे सर्व निर्बंध दूर होत असतानाच यंदाचा गुढीपाडवा मुंबईकरांसाठी आनंदाची गुढी उभारणारा ठरणार आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईच्या मेट्रो सेवांमध्ये आणखी दोन मेट्रो मार्गांची भर पडणार आहे. दहिसर पश्चिम ते डहाणूकर वाडी अशी मेट्रो २ अ आणि आरे ते दहिसर पूर्व अशी मेट्रो ७ या दोन मार्गांना शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही मार्गांवर ९ स्टेशनवरून प्रत्येकी ९ किलोमीटरचा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो धावू लागल्यानंतर आठ वर्षांनी आणखी दोन मेट्रो मार्गांची भर पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हे मेट्रो प्रकल्प उभारले आहेत. २०१४ मध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो सुरू झाली. मेट्रोचे तिकीट (रुपयांत)० ते ३ किमी     : १० ३ ते १२ किमी     : २० १२ ते १८ किमी     : ३० १८ ते २४ किमी     : ४० २४ ते ३० किमी     : ५० मेट्रो - २ अ आणि मेट्रो - ७ या दोन्ही मार्गांवर मिळून पहिल्या टप्प्यात २० किलोमीटर मार्गावर मेट्रो धावणारसकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत मेट्रो धावेल.मेट्रो - २ अ आणि मेट्रो - ७ या दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या एकूण १५० फेऱ्या चालविल्या जातील.मेट्रो मार्ग ७ : ६.२०८ कोटी (प्रकल्प खर्च)मार्ग : अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वलांबी : १६.४७५ किमीदहिसर पश्चिम ते डहाणूकर वाडी मेट्रो २ अमेट्रो मार्ग २ अ : ६ हजार ४१० कोटी (प्रकल्प खर्च)मार्ग : दहिसर पूर्व ते डीएन नगरलांबी : १८.५ किमीदहिसर पश्चिम, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एक्सर, बाेरिवली पश्चिम, पहाडी एक्सर, कांदिवली पश्चिम, डहाणूकर वाडीआरे ते दहिसर पूर्व मेट्रो ७आरे    दिंडोशी    कुरारआकुर्ली    पोईसर    मागाठणेदेवी पाडा    राष्ट्रीय उद्यान    ओवरी पाडा

टॅग्स :मेट्रोउद्धव ठाकरे