Join us  

अंतिम वर्षांच्या परिक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 9:34 PM

परिक्षेवरून सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना वस्तुस्थितीची कल्पनाच नसल्याचा आरोपही तनपुरे यांनी यावेळी केला.

मुंबई : अंतिम वर्षांच्या परिक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव आणि सल्लागार यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

कोरोना महामारीच्या काळात परीक्षेमुळे एकाही विद्यार्थ्याला  पार्श्वभूमीवर एकाही विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात येणार नाही, त्यादृष्टीने नियोजन करून व्यवस्थितपणे परिक्षा पार पाडण्याबाबत चर्चा झाली. लवकरच पुन्हा एकदा कुलगुरू, विद्यार्थी संघटनांशी चर्चा करून परिक्षांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

परिक्षेवरून सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना वस्तुस्थितीची कल्पनाच नसल्याचा आरोपही तनपुरे यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांची मानसिकता एकीकडे आणि भाजपचे राजकारण दुसरीकडे अशीच स्थिती महाराष्ट्रात आहे. विरोधी नेत्यांप्रमाणे आम्ही केवळ हवेतल्या गप्पा मारल्या नाही. कुलगुरू, प्राध्यापक, विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच परिक्षा ऎच्छिक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय, तो कायद्याच्या कसोटीत बसविण्याचाही प्रयत्न सरकारने केला. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर आवश्यक नियोजन करण्यात येईल, असेही राज्यमंत्री तनपुरे म्हणाले.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

टॅग्स :उद्धव ठाकरेपरीक्षामहाराष्ट्रविद्यार्थी