Join us  

मी कोणाच्या उज्ज्वल भवितव्याच्या आड येत नाही, पण...; उद्धव ठाकरेंचा नेम अजित पवारांवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 9:06 AM

CM Uddhav Thackeray Interview: त्यासोबतच पालखीत तुम्हाला बसवायला कोणी तयार आहेत का? असतील तर अवश्य जा, मी कुणाच्याही उज्ज्वल भवितव्याच्या आड येऊ शकत नाही. येत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात पालखीत बसण्याचं स्थान मिळत असेल, जरुर पालखीत बसा

ठळक मुद्देकिती असे पक्षांतर केलेले नेते दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे झाले? एक ठराविक काळ गेल्यानंतर त्यांचीही कारकीर्द कापली जातेकोणताही विरोधी पक्षांतला नेता दाखवा, जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेलाय, मुख्यमंत्री झालाय

मुंबई – राज्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार असं काही जण सांगतात, मग वाट कसली बघताय, आता पाडा, मुलाखात चालू असताना सरकार पाडा, काही जणांना घडवण्यात आनंद असतो तर काही जणांना बिघडवण्यात आनंद मिळतो, बिघडवायचं असेल तर बिघडवा, मला पर्वा नाही, सरकार पाडा असं खुलं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीभाजपाला दिलं आहे.

या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले की, पैशांचा वापर करुन सरकार पाडलं जातं, पैशाचा असा वापर केला तर गुन्हा होत नाही, पण तुमच्या कोणी विरोधात असेल तर त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावता. सगळे दिवस सारखे नसतात, हे लक्षात ठेवा, दिवस बदलत असतात. हेही दिवस जातील सगळेच दिवस जात असतात. महाराष्ट्रात फोडाफोडी करुन बघा असं त्यांनी सांगितले. त्याचसोबतच असा कोणताही विरोधी पक्षांतला नेता दाखवा, जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेलाय, मुख्यमंत्री झालाय, तुम्हाला तुमच्या पक्षात काय मिळत नाहीय की, तुम्ही दुसऱ्या पक्षात जाताय. कित्येक अशी उदाहरण आहेत अशी फोडाफोडी होते त्यामागे वापरा आणि फेकून द्या ही नीती सर्वांनी अवलंबली आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.(CM Uddhav Thackeray Interview)

तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'

तसेच दुसऱ्या पक्षाने केवळ वापरा आणि फेकून द्या करण्यासाठी आपला वापर करु द्यायचा की, आपण आपल्या पक्षात ठामपणाने काम करत राहायचं हे प्रत्येकाने ठरवावं. कदाचित एखादी व्यक्ती किंवा नेता आपल्या पक्षात आपल्यावर अन्याय करु शकत असेल किंवा करत असेल पण तुम्ही त्या पक्षाचा त्याग करुन दुसऱ्याची पालखी वाहणे हे करायचं. शेवटी पालखीच वाहणार ना की पालखीत बसणार आहात? मिरवायला असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला आहे.

त्यासोबतच पालखीत तुम्हाला बसवायला कोणी तयार आहेत का? असतील तर अवश्य जा, मी कुणाच्याही उज्ज्वल भवितव्याच्या आड येऊ शकत नाही. येत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात पालखीत बसण्याचं स्थान मिळत असेल, जरुर पालखीत बसा, पण पालखीचे भोई होण्यासाठी जाऊ नका. पालखीचं ओझं व्हायचं असेल तर जाऊ शकता. किती असे पक्षांतर केलेले नेते दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे झाले? एक ठराविक काळ गेल्यानंतर त्यांचीही कारकीर्द कापली जाते, जो मूळ गाभा असतो तुमच्या पक्षाच्या विचाराचा तो महत्त्वाचा असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अजित पवारांना मोलाचा सल्ला दिला आहे.(CM Uddhav Thackeray Interview)

पाहा व्हिडीओ

 

टॅग्स :उद्धव ठाकरेअजित पवारराजकारणभाजपा