महाविद्यालयीन परिसर पूर्णपणे ड्रगमुक्त करणार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:01 IST2026-04-01T09:01:50+5:302026-04-01T09:01:50+5:30

कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

CM Fadnavis Announces Major Crackdown on Drugs in Colleges Police to Use AI for Security | महाविद्यालयीन परिसर पूर्णपणे ड्रगमुक्त करणार : मुख्यमंत्री

महाविद्यालयीन परिसर पूर्णपणे ड्रगमुक्त करणार : मुख्यमंत्री

मुंबई : शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस महासंचालक नवीन रणनीती तयार करत असून, महाविद्यालयीन परिसर पूर्णपणे ड्रगमुक्त केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्थवार्षिक परिषद मुंबईत पार पडली. या परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.  तस्करीविरोधातील मोठ्या कारवाईचा रोडमॅप मांडत त्यांनी नक्षलवाद निर्मूलन, पोलिसिंगमध्ये एआयचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले. बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी डेटा-आधारित टूल विकसित केली जाणार असून, यासाठी आयआयटीसारख्या संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही साधने प्रत्यक्ष वापरात आणली जाणार आहेत.

दोषसिद्धी दर ९५ टक्क्यांपर्यंत वाढवणार

 कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच मागील ४-५ वर्षातील अपयशी ठरलेल्या गुन्हे प्रकरणांचे विश्लेषण करण्यासाठी सीआयडीला एआय टूल्स वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून, सध्याचा ५० टक्के दोषसिद्धी दर ९५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. नागपूर आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील यशस्वी मॉडेलमुळे अपघातात ३० टक्क्यांनी घट झाली असून, ही पद्धत राज्यातील इतर महामार्गांवरही लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. सायबर सुरक्षा, सामाजिक सलोखा आणि पोलीस कल्याण या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Web Title : महाराष्ट्र होगा नशामुक्त: मुख्यमंत्री ने की व्यापक नशा-विरोधी रणनीति की घोषणा

Web Summary : महाराष्ट्र का लक्ष्य नशामुक्त कॉलेज परिसर है। मुख्यमंत्री ने नई नशा-विरोधी रणनीतियों, एआई पुलिसिंग और अवैध अप्रवासियों का पता लगाने के लिए उपकरणों की घोषणा की। सरकार का लक्ष्य दोषसिद्धि दर को 95% तक बढ़ाना और सफल राजमार्ग मॉडल का उपयोग करके दुर्घटनाओं को कम करना है। साइबर सुरक्षा और पुलिस कल्याण पर भी ध्यान केंद्रित किया गया।

Web Title : Maharashtra to be Drug-Free: CM Announces Comprehensive Anti-Drug Strategy

Web Summary : Maharashtra aims for drug-free college campuses. CM announced new anti-drug strategies, AI policing, and tools to detect illegal immigrants. The government aims to increase conviction rates to 95% and reduce accidents using successful highway models. Focus on cybersecurity and police welfare too.