Join us

एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; निवडणुकीसंदर्भात चर्चा नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 06:44 IST

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांना काही सल्ले दिले होते.

मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना मनसेसोबत युती करणार, अशा शक्यता वर्तविल्या जात असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी या भेटीत निवडणुकांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांना काही सल्ले दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे शिवतीर्थावर पोहोचल्याने भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, आमदार सदा सरवणकर यांच्यासह मनसेचे काही पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत निवडणुकांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील नियम पाळलेच पाहिजेत. भोंगा आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे तपासून घेऊन मगच निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर शिंदे यांनी दिली.  उद्धव ठाकरे यांच्या मागोमाग सभा घेत नसून सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सभा घेतो, असेही ते म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेमनसे