जय हो! कोस्टल रोडवर देशातील पहिला ‘मेलडी रोड’; CM फडणवीस, DCM शिंदे यांनी केले लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:52 IST2026-02-11T16:51:52+5:302026-02-11T16:52:33+5:30

Mumbai Coastal Melody Road: भविष्यातही अशा अभिनव सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

cm devendra fadnavis and deputy cm eknath shinde inaugurated jai ho india first melody road on coastal road in mumbai | जय हो! कोस्टल रोडवर देशातील पहिला ‘मेलडी रोड’; CM फडणवीस, DCM शिंदे यांनी केले लोकार्पण

जय हो! कोस्टल रोडवर देशातील पहिला ‘मेलडी रोड’; CM फडणवीस, DCM शिंदे यांनी केले लोकार्पण

Mumbai Coastal Melody Road: भारतातील हा पहिलाच संगीतमय रस्ता असून अत्यंत अभिनव अशा या संकल्पनेमुळे मुंबईकरांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होईल. सध्या सुमारे ५०० मीटर अंतरावर तयार करण्यात आलेला हा प्रकल्प पुढे वाढवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोस्टल रोड अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्गावर देशातील पहिल्या ‘मेलडी रोड’चा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २०२६ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्यक्ष प्रवास करून संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला. वाहन चालवत असताना ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू आली, हा वेगळाच आणि आनंददायी अनुभव असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी हंगेरीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून उपस्थित हंगेरीचे काउन्सिल जनरल यांचे त्यांनी अभिनंदन केले. या उपक्रमाची संकल्पना मांडल्याबद्दल खासदार राहुल शेवाळे यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.

मुंबईत आणि कदाचित देशात पहिल्यांदाच असा मेलोडी रोड साकारला गेला असून या उपक्रमामुळे शहराच्या नावात आणखी एक नाविन्यपूर्ण भर पडली आहे. भविष्यातही अशा अभिनव सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत सर्व संबंधितांचे अभिनंदन करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

 

Web Title : मुंबई कोस्टल रोड पर भारत का पहला 'मेलोडी रोड' खुला

Web Summary : मुंबई के कोस्टल रोड पर भारत का पहला 'मेलोडी रोड' खुला, जिसका उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस और उपमुख्यमंत्री शिंदे ने किया। 500 मीटर का यह मार्ग गाड़ी चलाते समय 'जय हो' बजाता है, जो देशभक्ति और खुशी का अनुभव कराता है। इस परियोजना में हंगेरियन तकनीक का उपयोग किया गया।

Web Title : India's First 'Melody Road' Opens on Mumbai Coastal Road

Web Summary : Mumbai's Coastal Road unveils India's first 'Melody Road,' inaugurated by CM Fadnavis and DCM Shinde. The 500-meter stretch plays 'Jai Ho' while driving, creating a patriotic and joyful experience. Hungarian technology was used to create this innovative project.