मुंबईवर ढगफुटी; आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 07:24 AM2019-09-05T07:24:29+5:302019-09-05T07:24:57+5:30

रायगडमध्ये चार नद्यांना पूर : ठाणे, पालघरलाही तडाखा; रस्ते, विमान वाहतूक कोलमडली, वीज-पाणीपुरवठा खंडित

Clouds over Mumbai; another 2 days will heavy rain in mumbai | मुंबईवर ढगफुटी; आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचे

मुंबईवर ढगफुटी; आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचे

googlenewsNext

मुंबई : मुंबई आणि परिसरावर अक्षरश: ढगफुटीसारख्या कोसळलेल्या पावसाने ऐन बुधवारी जनजीवन कोलमडून गेले. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक नऊ तासांहून अधिक काळ बंद पडली. ती कधी सुरू होईल, याची माहिती रात्री उशिरापर्यंत अधिकारी देऊ शकत नव्हते. मुंबई शहरापेक्षा उपनगरांना आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला दिवसभर झोडपून काढणाऱ्या पावसाने रात्रीही आपला जोर कायम ठेवला. मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभरात सरासरी ३७४ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. रेल्वेचे तिन्ही मार्ग कोलमडल्याने सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. रस्त्यावरील खड्डे, अवजड वाहने यामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदगतीने सुरू होती. त्यातच पाणी साचल्याने गाड्या बंद पडल्या. अडकून पडल्या. त्यामुळे कोंडीत भर पडली. कमी दृश्यमानतेचा परिणाम विमानसेवेवरही झाला. विमाने तासभर विलंबाने धावत होती.

अनेक विमानांचे मार्ग बदलण्याची वेळ आली. रात्रीपासून बरसणारा पाऊस आणि त्याला जोडून दुपारी साडेतीन वाजता आलेल्या ४.१८ मीटरच्या मोठ्या भरतीमुळे मुंबईतून पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे सखल भाग पाण्याखाली गेले. पावसाचा जोर इतका होता की, मुंबईत बुधवारी सकाळी ८ ते दुपारी २ या सहा तासांच्या कालावधीत शहर परिसरात सरासरी १००.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरांमध्ये १३१.४९ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांमध्ये १४५.६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस दादर परिसरात झाला असून तिथे १६८.१५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सायन, कुर्ला, चुनाभट्टी, कांजूरमार्ग, नाहूर, मुलुंड, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, माहीम, माटुंगा रोड, वसई, विरार, नालासोपारा भागांत रुळांवर पाणी साचले. त्यामुळे ठाणे ते सीएसएमटी वाहतूक पूर्णत: बंद पडली. ठाणे स्थानकावर सायंकाळी प्रवाशांची इतकी गर्दी झाली की त्यातून चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की झाली. ठाणे ते कल्याण, कसारा, कर्जत, खोपोली लोकल सेवा सुरू होती. मात्र गाड्या कूर्मगतीने सुरू होत्या.
हार्बर मार्गावरील मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर, कुर्ला, चुनाभट्टीत पाणी रेल्वे ठप्प झाली. सकाळच्या वेळी सीएसएमटी ते वडाळा, अंधेरी ते गोरेगाव लोकल सेवा सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने या मार्गावरील सेवा बंद करण्यात आली. चर्चगेट ते अंधेरी वाहतूक रात्रीपर्यंत बंद होती. ती हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू झाली.

मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही झाला. मुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. काही एक्स्प्रेसच्या मार्गात, तर काही एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला. सीएसएमटी ते चेन्नई, सीएसएमटी-भुवनेश्वर, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर, सीएसएमटी ते पुणे, सीएसएमटी ते कोल्हापूर, सीएसएमटी ते मनमाड या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. पावसाने रायगड जिल्ह्यातील चार नद्यांना पूर आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पालघरमध्येही पावसामुळे जनजीवन कोलमडले. अनेक भागांतील वीजपुरवठा बंद पडला. नवी मुंबई- पनवेल परिसरातील पावसामुळे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने बारवी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. 

चार दिवसांत पडला महिन्याभराचा पाऊस

च्सांताक्रुझ वेधशाळेत १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत २८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत १२१ मिलीमीटर पाऊस पडला. तो चारशे तीन मिमी आहे. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात सरासरी ३२७ मिमी पाऊस पडतो. मात्र या चार दिवसांत महिन्याभराएवढा पाऊस पडला आहे. ३ सप्टेंबरपासून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. महापालिका क्षेत्रात वर्ष २००८ ते २०१८ या ११ वर्षांतील सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाची सरासरी ही ३४१ मिलीमीटर एवढी होती. तथापि, १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर २०१९ या सुमारे चार दिवसांच्या कालावधीत पडलेल्या पावसाची सरासरी ३९९.४ मिलीमीटर एवढी आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत पडलेल्या पावसाने गेल्या ११ वर्षांची सप्टेंबर महिन्याची सरासरी ओलांडली आहे.

मंडपांतही शिरले पाणी, गणेशभक्तांचा विरस

च्पावसाचा जोर वाढू लागताच गणेशोत्सव मंडळांची तारांबळ उडली. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पडणाºया पावसाचा अंदाज गृहात धरून मंडळांनी उपाययोजना केल्या होत्या. त्या कोलमडून गेल्या. अनेक ठिकाणी मंडपात पाणी भरले. त्यामुळे सजावटीचे साहित्य उचलताना कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. पुजेची गणेशमूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात आली. पाणी भरल्यानंतर वीज कंपन्यांनी वीजपुरवठा बंद केला. शिवाय वीजपुरवठा बंद करण्याची सूचना गणेशोत्सव मंडळांना करण्यात आली.
च्सहकुटुंब गणेशदर्शनासाठी निघालेल्या गणेशभक्तांचा

Web Title: Clouds over Mumbai; another 2 days will heavy rain in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.