दिवाळीसाठी खरेदी केलेले कपडे चोरले; एकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:19 IST2025-10-11T10:19:15+5:302025-10-11T10:19:26+5:30
४ ऑक्टोबरला राहुल वगळता सर्वांनी मिळून दिवाळीनिमित्त कपड्यांची खरेदी केली होती.

दिवाळीसाठी खरेदी केलेले कपडे चोरले; एकावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने खरेदी केलेले कपडे आणि रोख रक्कम चोरून पसार झाल्याचा प्रकार सांताक्रुज पश्चिमेतील गजधर बंद परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शैलेश निर्मल (२८) यांच्या तक्रारीवरून राहुल गौतम या युवकाविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी ९ ऑक्टोबरला गुन्हा नोंदवला आहे.
निर्मल हे गारमेंटमध्ये कपडे इस्त्री करण्याचे काम करतात. राहुल गौतम, लवकुश गौतम, सुशील गौतम आणि गोविंद गौतम हेही त्यांच्यासोबत काम करतात. ४ ऑक्टोबरला राहुल वगळता सर्वांनी मिळून दिवाळीनिमित्त कपड्यांची खरेदी केली होती. मात्र, ६ ऑक्टोबरला राहुल कामावर आला नाही. त्याच दिवशी शैलेश आणि त्यांचे सहकारी घरी परतले असता वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत पडलेल्या आढळल्या.
कपडे, छोटी शेगडी आणि रोख रक्कम, असा ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल गायब झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी राहुलवरच संशय घेण्यात आला आहे. त्याने मुद्देमाल पळवून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.