येणाऱ्याला गुजरातच्या निरमाने स्वच्छ करतो! भाजप आमदाराचे खळबळजनक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 05:50 IST2023-03-17T05:49:43+5:302023-03-17T05:50:10+5:30
भूषण देसाई यांची एमआयडीसीची ४०० कोटींची फाइल आहे म्हणून ते आलेले नाहीत

येणाऱ्याला गुजरातच्या निरमाने स्वच्छ करतो! भाजप आमदाराचे खळबळजनक विधान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. नेमका हाच विषय भाजप आमदार रमेश पाटील यांनी विधानपरिषदेत काढला. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते. त्यामुळे आमच्याकडे जो येईल तो साफ होईल, असे विधान त्यांनी केले.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारी योजनांचे कौतुक करताना रमेश पाटील यांनी भूषण देसाई यांचा विषय काढला. ते म्हणाले, कोणी तरी म्हणाले भूषण देसाई यांची एमआयडीसीची ४०० कोटींची फाइल आहे म्हणून ते आले. मात्र म्हणून ते आलेले नाहीत तर हे सरकार चांगले काम करते आणि न्याय देते म्हणून ते इथे आले आहेत. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते. त्यामुळे आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार आहे आणि हे खरे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"