आईवडिलांसमोरच चिमुकलीने सोडले प्राण; ओव्हरटेकचा बळी, लालबाग पुलावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:57 IST2023-06-06T12:57:10+5:302023-06-06T12:57:43+5:30

काळाचौकी पोलिस तपास करत आहेत. 

child died in front of his parents victim of overtaking lalbaug bridge incident | आईवडिलांसमोरच चिमुकलीने सोडले प्राण; ओव्हरटेकचा बळी, लालबाग पुलावरील घटना

आईवडिलांसमोरच चिमुकलीने सोडले प्राण; ओव्हरटेकचा बळी, लालबाग पुलावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लालबाग उड्डाणपुलावर टॅक्सीला ओव्हरटेक करत असताना झालेल्या दुचाकी अपघातात आईवडिलांसोबत दुचाकीवरून निघालेल्या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रियांशी उमेश टाक (३) असे मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी काळाचौकी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास रियांशी ही वडील उमेश आणि आई वैशाली यांच्यासोबत जात असताना दुचाकींचा लालबाग उड्डाणपुलावर अपघात झाला. त्यांना तत्काळ जवळच्या मसीना रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला मृत म्हणून जाहीर केले. या घटनेने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला. टॅक्सीला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत असून वडिलांविरुद्धच गुन्हा नोंदवीत काळाचौकी पोलिस तपास करत आहेत. 

दुसऱ्या घटनेत, घाटकोपर येथील नालंदा बस स्टॉपसमोर उभ्या असलेल्या प्रदीप मोतीराम घागरे (३१) या तरुणाला धडक दिल्याने जखमी झाला. त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी अनोळखी  वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

 

Web Title: child died in front of his parents victim of overtaking lalbaug bridge incident

टॅग्स :Accidentअपघात