शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 12:49 AM2020-07-15T00:49:33+5:302020-07-15T00:50:16+5:30

स्व. चव्हाण यांच्या १०० व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

Chief Minister Uddhav Thackeray testified that he would take the state on the path shown by Shankarrao Chavan | शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

Next

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचे मार्गदर्शन घेऊन, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
स्व. चव्हाण यांच्या १०० व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षात स्व. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचे स्मरण होणे ही आजची गरज आहे. वीज, शेती, पाटबंधारे आदी क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच राज्यात विद्युत प्रकल्प व धरणांची निर्मिती झाली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नानांचे सर्व पक्षातील नेत्यांची चांगले संबंध होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणे, जल संवर्धनात काम करणाऱ्यांसाठी जलपुरस्कार देणे आदी उपक्रम राबविले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्व. शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या प्रशासनाला वेगळी दिशा दिली. कठोर प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. त्यांचे जल नियोजनातील काम अतुलनीय आहे. जायकवाडी, उजनी सारखी धरणे ही त्यांच्या उत्तम जलनियोजनाची उदाहरणे आहेत.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

कार्य व विचार नेहमीच प्रेरणादायी
मुख्यमंत्री म्हणाले, स्व. चव्हाण यांचे वर्णन एका वाक्यात करणे शक्य नाही. आज ‘आधुनिक भगीरथ’ गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
हा ग्रंथ तळागाळात गेला पाहिजे. चव्हाण यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण करणे किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरू करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य व विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आज असे व्यक्तिमत्त्व सापडणे कठीण आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray testified that he would take the state on the path shown by Shankarrao Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.