मुंबई - मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन मुंबईकरांच्या सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेणारी बैठक मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज पार पडली, यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून 'सुरक्षित मुंबई'साठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, मुंबईच्या सुरक्षेचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 20:32 IST