Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ठाकरे आज पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 06:09 IST

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असेल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी दिल्लीला जात असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. मुख्यमंत्री ठाकरे सकाळी १२ वाजता पंतप्रधानांना भेटतील, तर सायंकाळी ६ वाजता ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना एनडीएत असताना पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही डीजी परिषदेच्या निमित्ताने उभयतांची पुण्यात विमानतळावर भेट झाली होती.

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी औपचारिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी सोनिया गांधी यांच्या भेटीत शिवसेनेला संपुआत घेण्यावर चर्चा होऊ शकते. 

टॅग्स :सोनिया गांधीउद्धव ठाकरेनरेंद्र मोदी