‘पंकजा मुंडेंविरोधात एसीबीकडे तक्रार मुख्यमंत्र्यांनी करावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 06:29 IST2019-03-09T06:29:17+5:302019-03-09T06:29:28+5:30

मुंडे यांच्यावर मोबाइल घोटाळ्याचा आरोप असून, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली.

Chief Minister should file complaint against ACB against Pankaja Munde | ‘पंकजा मुंडेंविरोधात एसीबीकडे तक्रार मुख्यमंत्र्यांनी करावी’

‘पंकजा मुंडेंविरोधात एसीबीकडे तक्रार मुख्यमंत्र्यांनी करावी’

मुंबई : महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर मोबाइल घोटाळ्याचा आरोप असून, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली.
मोबाइलची मूळ खरेदी किंमत आणि सरकारने खरेदी केलेली किंमत, खरेदीसाठी काढलेली निविदा आदीची समितीतर्फे निष्पक्ष चौकशी करून ती जनतेसमोर मांडावी आणि सत्य समोर आणावे, अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.

Web Title: Chief Minister should file complaint against ACB against Pankaja Munde