महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शेलारांनी ठरवू नये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 02:19 IST2020-11-22T02:18:35+5:302020-11-22T02:19:06+5:30
परिवहन मंत्री अनिल परब यांचा टोला

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शेलारांनी ठरवू नये
मुंबई : भाजपच्या आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये, त्यांना पक्षाने मुंबई सोडून ठाण्याला का पाठवले याचे चिंतन करावे, असा टोला परिवहनमंत्री अनिल परब यांनी लगावला.
पत्रकारांनी बोलताना परब म्हणाले, भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत. त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, असे मत व्यक्त केले होते.
आपले स्थान काय याचा शोध घ्यावा
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शेलार यांना भाजपने ठाण्याची जबाबदारी
दिली आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केलेले असताना त्यांना ठाण्यात का पाठवले? यावर
त्यांनी स्वतः अंतर्मुख होऊन चिंतन करावे.
पक्षातले आपले स्थान काय झाले आहे याचा शोध घ्यावा, असेही परब म्हणाले.