Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सावध रहावे, मित्र म्हणून माझा त्यांना इशारा'; नाना पटोलेंनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 13:08 IST

मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.

मुंबई-  राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. आता या सरकारमध्ये राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीतही उभी फूट पडल्याचे दिसत आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा आहे. त्यांनी सावध रहावे असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदेंना दिला आहे.  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोन उपमुख्यमंत्र्यांपासून त्यांनी सावध रहावे, असा इशारा काँग्रेस नेते नाना पटोल यांनी दिला. 

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. भाजप अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देणार असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :नाना पटोलेएकनाथ शिंदे