मुंबई मनपातील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती; CM एकनाथ शिंदे यांची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 19:50 IST2023-06-19T19:49:05+5:302023-06-19T19:50:11+5:30

विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी रुपयांची अनियमितता निदर्शनास आली आहे.

Chief Minister Eknath Shinde approves special inquiry committee to investigate irregularities in Mumbai Municipal Corporation | मुंबई मनपातील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती; CM एकनाथ शिंदे यांची मंजुरी

मुंबई मनपातील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती; CM एकनाथ शिंदे यांची मंजुरी

मनोहर कुंभेजकर
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.

यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे आमदार अमित साटम यांनी लोकमतला सांगितले.

 

 

Web Title: Chief Minister Eknath Shinde approves special inquiry committee to investigate irregularities in Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.