वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी मुख्यमंत्री शनिवारी दावोसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:58 IST2026-01-15T09:56:49+5:302026-01-15T09:58:23+5:30
राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि औद्योगिक विकासाला चालना देणे या उद्देशाने हा दौरा आयोजित केला आहे

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी मुख्यमंत्री शनिवारी दावोसला
मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक परिषद-२०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे शिष्टमंडळ शनिवारी दावोसला रवाना होणार आहे. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि औद्योगिक विकासाला चालना देणे या उद्देशाने हा दौरा आयोजित केला आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामार्फत दावोस येथील इंडिया पॅव्हेलियनमध्ये राज्य शासनाचा सहभाग निश्चित केला आहे. या समन्वयासाठी कॉन्फेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ही नोडल संस्था आहे
या शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत, अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेला वेलारसु, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह आणि मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूकविषयक मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांचा समावेश आहे.