Join us  

मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन तर शरद पवारांनी पत्र लिहून राज्यपालांना दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 7:00 PM

राज्यपाल यांनी शिक्षक बनून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर, पत्रकारितेतही त्यांनी काही वर्षे काम केलं. त्यानंतर, त्यांनी राजकारणाची वाट धरली

ठळक मुद्देराज्यापाल कोश्यारी यांचा आज वाढदिवस असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज 80 वाढदिवस साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिग्गजांकडून राज्यपालांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच मंत्री आणि विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांची भेट घेतली. 

राज्यपाल यांनी शिक्षक बनून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर, पत्रकारितेतही त्यांनी काही वर्षे काम केलं. त्यानंतर, त्यांनी राजकारणाची वाट धरली. राजकारणातही त्यांना मोठं यश मिळाल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनून त्यांनी राज्य कारभार हाताळला आहे. आता, सध्या ते महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त आहेत. मराठी भाषेत शपथ घेणारे राज्यपाल म्हणून त्यांनी मराठीजनांनी वाह वा मिळवली आहे.  राज्यापाल कोश्यारी यांचा आज वाढदिवस असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं असून उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

संजय राऊतांकडून शुभेच्छा अन् भेट देण्याची अपेक्षा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचं आपल्या स्टाईलमध्ये अभिष्टचिंतन केलं आहे. इतकंच नाही तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केलंय. 

12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा ऐरणीवर

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर 15 जून रोजी सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं. तर दुसरीकडे 12 आमदार यांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 12 आमदारांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, 25 जूनला पुढील सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभगत सिंह कोश्यारीमुख्यमंत्रीउद्धव ठाकरे