छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 19:43 IST2024-09-26T19:42:15+5:302024-09-26T19:43:09+5:30
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले.

छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
Chhagan Bhujbal : मुंबई: महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अचानक बिघडल्यामुळे छगन भुजबळ यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले.
छगन भुजबळ आज (दि.26) पुण्यात होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने छगन भुजबळ यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या छगन भुजबळ यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्येही अस्वस्थ वाटू लागल्याने रग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हा व्हायरल इन्फेक्शनमुळे छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.