Mumbai Chembur Landslide: चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांची नावे जाहीर; मुसळधार पाऊस, वीज पुरवठ्यावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 04:13 PM2021-07-18T16:13:37+5:302021-07-18T16:33:13+5:30

Mumbai landslide: पावसाने शनिवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळली.

Chembur landslide, Vikhroli tragedy death name announced by BMC | Mumbai Chembur Landslide: चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांची नावे जाहीर; मुसळधार पाऊस, वीज पुरवठ्यावर परिणाम

Mumbai Chembur Landslide: चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांची नावे जाहीर; मुसळधार पाऊस, वीज पुरवठ्यावर परिणाम

googlenewsNext

मुंबई - मुंबईमध्ये पावसाने कहर केला असून चेंबूरमध्ये (chembur landslide) काही घरांवर दरड कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत विक्रोळीमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांची ओळख पटली असून पालिकेने या मृतांची नावे जाहीर केली आहेत. (chembur, Vikhroli tragedy death name list declared by BMC.)

पावसाने शनिवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळली. या घटनेत चार ते पाच घरे पडली आहेत. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.

चेंबुर येथील दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. १६ मृतांपैकी रात्री ऊशिरापर्यंत १४ जणांची ओळख पटली होती तर २ जणांची ओळख पटली नव्हती. मीना झिमुर (४५), पंडित राम गोरसे (५०), शीला गौतम पारधे (४०), शुभम गौतम पारधे (१०), श्रृती गौतम पारधे (१५), मुकेश जयप्रकाश अग्रहारी (२५), जिजाबाई तिवारी (५४), पल्लवी दुपारगडे (४४), खुशी सुभाष ठाकुर (२), सुर्यकांत रविंद्र झिमुर (४७), उर्मिला ठाकूर (३२), छाया पंडित गोरसे (४७), अपेक्षा सुर्यकांत झिमुर (२०), प्राची पंडित गोरसे (१५) अशी मृतांची नावे असून, दोघांची ओळख पटलेली नाही. 

विक्रोळी येथील दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. अंकित तिवारी (२३), रामनाथ राजनारायण तिवारी (४५), आशिष विश्वकर्मा (१९), प्रिन्स हंसराज विश्वकर्मा (११), कल्पना जाधव (३५), साहेबराव जाधव (४४), कविता रामनाथ तिवारी (४२) अशी येथील मृतांची नावे आहेत. 

चांदिवली येथे दरड कोसळून २ जखमी झाले.

भांडूप येथे घराच्या भिंतीचा भाग पडून सोहम महादेव थोरात (१६) याचा मृत्यू झाला.

अंधेरी येथे शॉक लागून मोहम्मद सलीम पटेल (२६) यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आजच्या पावसाने २६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाची आठवण ताजी केली. त्यावेळी मुंबईमध्ये २४ तासांत ९४४ मिमी पाऊस पाऊस पडला होता. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय हवामान विज्ञान विभाग (आयएमडी) ने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने सकाळी प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये सांगितले की, हवामानातील बदलांमुळे मुंबईत सहा तासांत १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला. दरम्यान हमामान विभागाने शहरासाठीच्या पावसाच्या अंदाजाला ऑरेंजमधून रेड अलर्टमध्ये बदलले आहे.

Web Title: Chembur landslide, Vikhroli tragedy death name announced by BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.