स्कायवॉकला हाय व्होल्टेज केबल्सचा बसला विळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:51 AM2019-07-18T01:51:00+5:302019-07-18T01:51:10+5:30

स्कायवॉक हाय व्होल्टेज केबल्स, चार मोबाइल टॉवर्स, हाय व्होल्टेज सब स्टेशन ट्रान्सफॉर्मर आणि जाहिरातीचा फलक अशा कारणांमुळे धोकादायक झाला आहे.

Check the high voltage cables for Skywalk | स्कायवॉकला हाय व्होल्टेज केबल्सचा बसला विळखा

स्कायवॉकला हाय व्होल्टेज केबल्सचा बसला विळखा

Next

सागर नेवरेकर 
मुंबई : अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाजवळील स्कायवॉक हाय व्होल्टेज केबल्स, चार मोबाइल टॉवर्स, हाय व्होल्टेज सब स्टेशन ट्रान्सफॉर्मर आणि जाहिरातीचा फलक अशा कारणांमुळे धोकादायक झाला आहे. महापालिका के/पूर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित एजन्सींना स्कायवॉकवरील धोकादायक गोष्टी काढण्याचे निर्देश दिले आहेत.
अंधेरी पूर्वेकडील आगरकर चौकाकडून गोखले उड्डाणपुलाकडे जाणाऱ्यांसाठी २ जून २०१० रोजी स्कायवॉक बांधण्यात आला. या स्कायवॉकसाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आले. दररोज लाखो मुंबईकर अंधेरीच्या आसपास कामानिमित्त ये-जा करतात. यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन मुले-मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार वर्गाचा समावेश असतो. स्कायवॉकलगत दोन्ही बाजूंना खासगी मोबाइल कंपन्यांचे चार मोबाइल टॉवर्स उभारले आहेत. टॉवर्सना विद्युत पुरवठा करणाºया हाय व्होल्टेज केबल्सने स्कायवॉकच्या एका बाजूने दुसºया बाजूला व्यापून टाकले आहे. हाय व्होल्टेज केबल्स स्कायवॉकच्या आधार घेऊन एका टोकापासून दुसºया टोकापर्यंत नेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे स्कायवॉकवर हाय व्होल्टेज सब स्टेशन ट्रान्सफॉर्मर उभारले आहे. हाय व्होल्टेज केबल्स एका टोकापासून दुसºया टोकापर्यंत नेण्यासाठी चक्क केबल ट्रे बसविला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मनसे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी यासंदर्भात सांगितले की, स्कायवॉकवरील हाय व्होल्टेज केबल्स, चार मोबाइल टॉवर्स, हाय व्होल्टेज सब स्टेशन ट्रान्सफॉर्मर यांच्यामुळे अकस्मात शॉर्टसर्किट होऊन आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते. तसेच स्कायवॉकचा आधार घेऊन १० बाय ३५ फुटांचा भला मोठा जाहिरात फलक लावण्यात आला आहे. जाहिरात फलकाला व चारही मोबाइल टॉवर्सना विद्युत पुरवठा याच सब स्टेशन ट्रान्सफॉर्मरमधून पुरवण्यात येतो.
महापालिकेच्या के/पूर्व विभागाचे अधिकारी गप्प राहून नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का? महानगरपालिकेने खाजगी कंपन्यांना कशी काय परवानगी दिली? यावर उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
>निश्चितपणे सांगणे कठीण
महापालिकेच्या के/पूर्व विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित कंपन्यांना स्कायवॉकवरील केबल्स, वायर्स, मोबाइल टॉवर्स, हाय व्होल्टेज सब स्टेशन ट्रान्सफॉर्मर आणि जाहिरातीचा फलक काढण्यास सांगितले आहे.
यामध्ये वेगवेगळ्या एजन्सींची भागीदारी आहे. त्यामुळे स्कायवॉक मोकळा कधी होईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही, अशी माहिती महापालिका के/पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Check the high voltage cables for Skywalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.