मुंबई: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मंगळवारी ट्विटर इंडियाच्या टॉप ट्रेंडलिस्टमध्ये झळकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने अनेक लोकांकडून मोठ्याप्रमाणावर ट्विट केली जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये आहे. सध्या छत्रपति शिवाजी महाराज हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, अनेक राजकीय नेत्यांनीही ट्विटच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरची मानवंदना, 'जाणता राजा' ट्रेंडिंगमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 11:29 IST