भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 05:43 IST2024-05-05T05:42:55+5:302024-05-05T05:43:10+5:30

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या सुप्रिया श्रीनेत यांनी शनिवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही टीका केली

Chanting of Rahul Gandhi from BJP itself! Criticism of Congress leader Supriya Srinet | भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात भाजप आणि मोदींविरोधात वातावरण आहे, याची जाणीव भाजपला होतेय, म्हणूनच काँग्रेस सत्तेवर आल्यास काय करेल याच्या खोट्या वावड्या उठवल्या जात आहेत. मागील दहा वर्षांत काय काम केले, हे सांगता येत नसल्यानेच भाजपनेते काँग्रेस आणि राहुल गांधी यांचाच जप करत आहेत, अशी टीका करताना महाविकास आघाडी मुंबईतील सहाही जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या सुप्रिया श्रीनेत यांनी शनिवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही टीका केली. त्या म्हणाल्या, भाजपच्या ४०० पार घोषणेमुळेच भाजपने काँग्रेस सत्तेत येणार हे मान्य केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय ही भाजपला गुंगवणारी चाल आहे. यामुळे भाजपची रणनीती उद्ध्वस्त झाली. आता अमेठीत एक सक्रिय कार्यकर्ता भाजपच्या उमेदवारावर सहज मात करेल, असा दावाही सुप्रिया श्रीनेत यांनी केला.

उज्ज्वल निकम यांच्यावर टीकास्त्र
nॲड. उज्ज्वल निकम हा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहे. कसाबच्या बिर्याणीबाबत त्यांचा खोटेपणा उघड झाला. 
nखोटेपणाची त्यांनीच कबुली दिलेली आहे. आता पुन्हा हाच माणूस उलट्या उड्या मारतोय. एका मुलीला डावलून भाजपने ॲड. निकम यांना उमेदवारी दिली आहे, अशी टीका सुप्रिया श्रीनेत यांनी यावेळी केली.

Web Title: Chanting of Rahul Gandhi from BJP itself! Criticism of Congress leader Supriya Srinet