कोकण रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 13:22 IST2023-09-30T13:20:52+5:302023-09-30T13:22:25+5:30
१ ऑक्टोबरपासून नेत्रावती एक्स्प्रेस दुपारी ४:४६ ऐवजी ५ वाजून ५ मिनिटांनी एलटीटीला पोहाेचेल.

कोकण रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या वेळापत्रक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वार्षिक वेळापत्रक नियमानुसार मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, मडगाव-एलटीटी एक्स्प्रेस आणि करमाळी-एलटीटीसह रोहा- दिवा मेमूच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून या गाड्या नवीन वेळेत सीएसएमटीला पोहोचणार आहेत. दरवर्षी रेल्वेतर्फे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येते. नवीन वेळापत्रकात नवीन मार्गावर गाड्या सुरू करण्यात येतात, तर काही मार्गांवरील गाड्यांची संख्या वाढविण्यात येते. याशिवाय काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येतो. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांच्या वेळेत बदल असून १ ऑक्टोबरपासून नेत्रावती एक्स्प्रेस दुपारी ४:४६ ऐवजी ५ वाजून ५ मिनिटांनी एलटीटीला पोहाेचेल.
सोमवार, २ ऑक्टोबरपासून मडगाव - एलटीटी एक्स्प्रेस रात्री ११:२५ ऐवजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी एलटीटीला येईल. तसेच ५ ऑक्टोबरपासून करमाळी - एलटीटी एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस रात्री ११:२५ ऐवजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी एलटीटीला पोहोचणार आहे.
गाड्या सध्याची वेळ १ नोव्हेंबरपासूनची वेळ
मडगाव - सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस रात्री ११:३० वा. रात्री ११:५५ वा.
मडगाव - सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस रात्री ११:५५ वा. रात्री १२:२० वा.
एर्नाकुलम - एलटीटी दुरान्तो एक्स्प्रेस संध्या. ६:१५ वा. संध्या. ६:५० वा.
रोहा - दिवा मेमू दुपारी ४:१५ वा. दुपारी ४:४० वा.