Chandrakant Patil Target Sharad Pawar on PHD Issue | 'हे' शरद पवारांना कसं जमतं?; चंद्रकांत पाटलांनी उलगडला पीएचडीचा अभ्यासक्रम

'हे' शरद पवारांना कसं जमतं?; चंद्रकांत पाटलांनी उलगडला पीएचडीचा अभ्यासक्रम

ठळक मुद्देमहाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ५ ते ७ खासदारांहून अधिक खासदार निवडून आले नाहीतमी १०-१२ वर्ष अभ्यास करण्यास तयार आहे.चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना लगावला प्रतिटोला

मुंबई - माझ्यावर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना १०-१२ वर्ष लागतील असा टोला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता त्यावरुन चंद्रकांत पाटलांनीही माझी विद्यार्थी म्हणून शिकण्याची तयारी आहे असा प्रतिटोला पवारांना लगावला. 

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी १०-१२ वर्ष अभ्यास करण्यास तयार आहे. आपण एखाद्या विषयाचं ज्ञान घेतो, ते मिशन म्हणून अभ्यास संशोधन निवडतो, त्याला वेळ लागतोच. मग त्यासाठी १२-१३ वर्ष लागतील कदाचित जास्तही लागू शकतात पण माझी तयारी आहे. पवारांच्या ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा मला अभ्यास करायचा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधीही महाराष्ट्रात ५ ते ७ खासदारांहून अधिक खासदार निवडून आले नाहीत. ते देशाच्या मध्यवर्ती कसं राहतात? त्याचसोबत एकाच वेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांना हवं ते करायला कसं लावतात? हे सगळं त्यांना कसं जमतं हा माझा पीएचडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे निश्चित याला वेळ लागेल पण तो वेळ मी देईन असं सांगत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना चिमटा काढला. 

दरम्यान, बारामतीमुळे १२ वर्ष लागतील असं पवार म्हणाले आहेत का असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारला असता अशा शब्दकोट्या शरद पवार नव्हे तर उद्धव ठाकरेंना चांगल्याच जमतात, त्यांना येतात असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला.  

काय म्हणाले होते शरद पवार? 
माझं वय ८० वर्षांचं तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर्षांपर्यंत गेली नाही. ५२ वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत वयाच्या २६व्या वर्षी प्रथम निवडून आलो. माझ्यावर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना १० ते १२ वर्ष लागतील. या पन्नास वर्षांच्या काळात अनेक गोष्टी होऊन गेल्या. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली. मी कॉलेजमध्ये असताना दिवसात अभ्यास सोडून सगळ्यात भाग घ्यायचो, महाविद्यालयीन निवडणुका कशा जिंकायच्या यावर विचार करायचो. मी २२ फेब्रुवारीला पहिली निवडणूक जिंकली होती असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक; काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली टीका

खुशाल श्वेतपत्रिका काढा, कोणत्याही चौकशीला घाबरत नाही- देवेंद्र फडणवीस 

दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात : मिटकरी

'या' मुद्द्यावरुन विरोधक पकडणार सरकारला कोंडीत; अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार? 

CAA: सीएए समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले; जाफरबादमध्ये झाली दगडफेक

 

English summary :
BJP Leader Chandrakant Patil Target NCP Chief Sharad Pawar on PHd Issue

Web Title: Chandrakant Patil Target Sharad Pawar on PHD Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.