कोकणात तुरळक पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 07:04 IST2021-11-08T07:00:09+5:302021-11-08T07:04:27+5:30

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

Chance of sparse rains in Konkan; Forecast by the Meteorological Department | कोकणात तुरळक पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

कोकणात तुरळक पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर आणखी वाढला असला तरी ते किनारपट्टीपासून दूर आहे. मात्र तरीही त्याचा परिणाम अद्याप कोकण किनाऱ्यावर होत असून, रविवारी संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण होते. याचा प्रभाव पुढील दोन दिवस कायम राहणार असून ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण, गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली. विदर्भाच्या 
बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असले तरी ते किनारी भागापासून दूर जात आहे. याचा परिणाम म्हणून ८, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी वादळी वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.
- कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ वैज्ञानिक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

Web Title: Chance of sparse rains in Konkan; Forecast by the Meteorological Department

टॅग्स :Rainपाऊस