Coronavirus: कांद्यासह भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:49 PM2020-03-24T19:49:19+5:302020-03-24T19:51:53+5:30

कोरोनाचे संकट; मंगळवारी 305 पैकी 89 बाजार समित्यांमध्ये खरेदी होती बंद

challenge of keeping vegetable and onion supply amid coronavirus | Coronavirus: कांद्यासह भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान

Coronavirus: कांद्यासह भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान

Next

- योगेश बिडवई 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरांमध्ये कांद्यासह भाजीपाल्याचा तुटवडा होऊ न देण्याचे राज्य सरकारसमोर आव्हान असणार आहे. मंगळवारी राज्यातील 305 पैकी 89 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विविध कारणांनी शेतमालाची खरेदी बंद होती. बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील बाजार समित्या बंद असतील. 

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने नाशिक विभागात 13 व औरंगाबाद विभागात 6 बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद करण्यात आली आहे. 

मंगळवारी नाशिक जिल्ह्यात लासलगावसह 4 मोठ्या कांद्याच्या बाजार समित्या अमावास्येमुळे बंद होत्या. त्यात संचारबंदीच्या नियमामुळे लासलगाव, पिंपळगाव आदी ठिकाणी व्यापाऱ्यांकडे ग्रामीण भागातून मजूर येण्यास अटकाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कांद्याची पॅकिंग व लोडिंग थांबली आहे. त्यातून कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे. 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे व परिसरातील महापालिकांना प्रामुख्याने पुणे, सातारा व नाशिक जिल्ह्यातून भाजीपाल्याचा पुरवठा होता. मंगळवारी पुणे विभागातील सर्व 22 कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू होत्या. त्यात भाजीपाल्याची सर्वसाधारण आवक होती. मंगळवारी औरंगाबाद विभागात 15, नाशिक विभागात 23 तर  लातूर विभागात सर्वाधिक 43 बाजार समित्या बंद होत्या, अशी माहिती पणन विभागाने लोकमतला दिली. 

मंगळवारी किती बाजार समित्या होत्या सुरू, किती बंद?
विभाग          सुरू      बंद  
पुणे               22        00
नाशिक          30        23
औरंगाबाद      21       15
कोल्हापूर        17       04
लातूर              05       43
नागपूर            49       01
अमरावती        54       01
रत्नागिरी         18       02

नाशिक जिल्ह्यात हजारो क्विंटल कांदा पडून
संचारबंदीच्या निर्बंधामुळे मजुरांना कोणी गावात येऊ देत नाहीत. त्यांची वाहने पोलीस अडवितात. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे हजारो क्विंटल कांदा पॅकिंगअभावी पडून आहे. सरकार एकीकडे मार्केट सुरू ठेवा सांगत आहे. मात्र दुसरीकडे पॅकिंगअभावी कांदा शहरात पाठविता येत नाही. सरकारने वाहनचालक व मजुरांना पास देण्याची गरज आहे. 
- नविन सिंह, कांदा व्यापारी, विंचूर, नाशिक

Web Title: challenge of keeping vegetable and onion supply amid coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.