चीनप्रश्नी केंद्राने भूमिका स्पष्ट करावी, मनोज नरवणेंचे पुस्तक प्रसिद्ध करा; काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:53 IST2026-02-04T16:51:07+5:302026-02-04T16:53:01+5:30

Congress News: जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

central govt should clarify on the china issue and publish manoj naravane book congress protests | चीनप्रश्नी केंद्राने भूमिका स्पष्ट करावी, मनोज नरवणेंचे पुस्तक प्रसिद्ध करा; काँग्रेसचे आंदोलन

चीनप्रश्नी केंद्राने भूमिका स्पष्ट करावी, मनोज नरवणेंचे पुस्तक प्रसिद्ध करा; काँग्रेसचे आंदोलन

Congress News: चीन प्रश्नी मोदी सरकारचा गलथानपणा आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकार विरोधात संतप्त भावना व्यक्त करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडून तात्काळ उत्तरांची मागणी केली.

देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकार मौन बाळगत असून सत्य दडपले जात आहे. गलवान प्रकरणावर काय लपवले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून चीन प्रश्नावर केंद्र सरकारने देशाला स्पष्ट उत्तर द्यावे तसेच माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, २०२० मधील चीन संघर्षासंदर्भात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केलेल्या गंभीर खुलाशांवर संसदेत बोलण्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना रोखण्यात आल्याने देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लष्कराच्या स्पष्ट सूचनांनंतरही केंद्र सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यामुळे शूर जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. या जवानांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

 

Web Title : चीन मुद्दे पर स्पष्टीकरण दे सरकार, किताब प्रकाशित करें: कांग्रेस का आंदोलन

Web Summary : कांग्रेस ने चीन मुद्दे पर सरकार से स्पष्टीकरण और जनरल नरवणे की किताब प्रकाशित करने की मांग करते हुए विरोध प्रदर्शन किया। गलवान मामले में सच्चाई छिपाने और राहुल गांधी को चुप कराने का आरोप लगाया।

Web Title : Congress Demands Clarity on China Issue, Book Release, Protests Erupt

Web Summary : Congress protested, demanding the government address the China issue and release General Naravane's book. They accuse the government of concealing truth about Galwan and silencing Rahul Gandhi, while seeking accountability for soldier deaths.